Home गुन्हा मॉल मधून ब्रँडेड वस्तू चोरणारे आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली

मॉल मधून ब्रँडेड वस्तू चोरणारे आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली

0

पुणे : परवेज शेख

चतुश्रृंगी पोलीस स्टेशनचे हदीत पॅव्हेलीयन मॉल सेनापती बापट रोड पुणे येथे असलेल्या शॉप पैकी ईथ्यास वॉच शॉपी नावाचे घड्याळ विक्रीचे दुकान आहे. या दुकानात दिनांक.८/०८/२०१९ रोजी दुपारी 3:30 ते 3:45 वाजताचे दरम्यान दोन अनोळखी इसमांनी येऊन रॅडो घडयाळ खरेदी करण्याचा बहाणा करुन सेल्समनची दिशाभुल करुन रॅडो कंपनीची ४ घड्याळे चोरुम नेली.सदरचा प्रकार झालेबाबत दिनांक.२३/०८/२०१९ रोजी स्टॉक चेक करीत असताना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दि.१/०८/२०१५ रोजी दिनांक.८/०८/२०१९ या दरम्यानचे कालावधील दुकानातील सी सी टीव्ही फुटेजची पहाणी करता दोन अनोळखी इसमांनी मॉलमध्ये येऊन रॅडो कंपनीची घडयाळे खरेदी करण्याचा बहाणा करुन सेल्समनची दिशाभुल करुन रेंडो कंपनीची ४ घडयाळे त्यांची बाजारातील किंमत रुपये 5,04,800 /- चोरी करुन घेऊन गेल्याचे लक्षात आले.

सदर बाबत मा.अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे सो, व पोलीस उप-आयुक्त गुन्हें बच्चनसिंह यांनी पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांना सर्व ओला कॅब व विमान सेवा पुरविणारे कंपन्यांची माहिती प्राप्त करुन व आरोपींचा तपशिल प्राप्त करुन मागदर्शन केले. पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांनी तपास टिम तयार करून टिममधील पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, पो.ना. सचिन ढवळे यांना तपासाचे सुचना दिल्या.त्याप्रमाणे आरोपी बाबतची माहिती काढत असताना पो.ना. सचिन ढवळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत आरोपी हे दिल्लीचे रहीवाशी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर टिमला दिल्ली येथे रवाना केले. सदर टिमने दिल्लीत ५ दिवस ठाण माडुन वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलेले आरोपी यांचेवर पाळत ठेऊन स्थानिक पोलीसांचे मदतीने दिल्लीतील लोधीबाग, लोधी कॉलनी.सेंट्रल गंज यातील आरोपी

१) आशिष कुशल बिस्त वय ३० वर्षे रा, घर नं.१६७ लखपत कॉलनी नवी दिल्ली, २) आकाश बालकिसन ढाका वय २६ वर्षे रा. के-८२ बी.के.दत्त कॉलनी लोधी रोड नवी दिल्ली.
3) रविंदरसिंग अमरजितसिंग वय ३२ वर्षे रा. घर नं.४८० बी.के.दत्त कॉलनी करबाला लोधी कॉलनी नवी दिल्ली यांना अटक करुन पुणे येथे आणले. अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी दिल्ली मुंबई पुणे अशा मोठ मोठया मेट्रो सिटीतील मॉलमध्ये शिरुन खरेदीच्या बहाण्याने चोरया केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पुण्यात चोरी केल्यानंतर
त्यांनी मुंबई लोअर.परेल येथील एक शोरुम मध्ये प्रवेश करुन आरमानी कंपनीचे महागडे टी शर्ट चोरी केले होते.


त्यावेळी तेथील सेल्समनचे चाणाक्षपणामुळे ते पकडले जाऊन त्यांना अटक झाली होती, त्यामध्ये १ आरोपी फरारी असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आता पर्यंतचे तपासात आरोपीचे आणखी १० ते १२ साथीदार आरोपी असून ते हँडसम गुप नावाने ओळखले जातात. आरोपी इसमांना बॅन्डेड वस्तू चोरुन त्या विकणे अथवा स्वतःहा वापरणे या त्यांच्या सवयीमुळे सेल्समनला त्याचा संशय येत नहता.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त श्री.बच्चनसिंह, पोलीस निरीक्षक श्री.अंजूम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक, व कर्मचारी सचिन ढवळे, अशोक शेलार, शंकर पाटील. निलेश शिवतरे, राजू मंचे, गणेश काळे, शंकर संपते, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांनी केली आहे.