मॉल मधून ब्रँडेड वस्तू चोरणा-या
गुन्हेगाराला युनिट ४ कडून अटक.
पुणे : परवेज शेख इसम नामे सुशांत सुभाष घोरपडे,रा पारिजात सोसायटी,सिंहगड रोड पुणे यांचे चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे हददीत पॅव्हेलियन मॉल.सेनापती बापट रोड,पुणे येथे असलेल्या शॉप पैकी ईथोंस नाँच शॉपी नावाचे घडीयाळ विक्रीचे दुकान आहे. या दुकानात दि.०८/०८/२०१९ रोजी दु.०३.३० ते ०३.४५ वा चे दरम्यान दोन अनोळखी इसमांनी येवून रॅडो घडयाळ खरेदी करण्याच्या बहाण्याने सेल्समनची दिशाभुल करुन रॅडो कंपनीची ०४ घडयाळे (कि रु ५.०४.८००/-) चोरुन नेल्यायावत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचा तपास मा अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री अशोक मोराळे व पोलीस उप आयुक्त.गुन्हे, श्री बच्चनसिंह यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस निरीक्षक श्री अंजुम वागवान व त्यांचे पथक करीत असताना प्राप्त सी सी टी व्ही फुटेजवरुन गुन्हयातील आरोपी हे दिल्ली येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
सदरवायत मा अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री अशोक मोरोळे व पोलीस
उपआयुक्त,गुन्हे, श्री बच्चनसिंह यांनी पोलीस निरीक्षक अंजुम वागवान यांना यातील पाहिजे असलेला आरोपी विवेक मनवरसिंग रावत रा फरीदाबाद, हरियाणा याचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे एक तपास टिम तयार करुन, टिममध्ये सहा पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी गणेश काळे, सागर घोरपडे यांना तपासाबावत सुचना दिल्या. त्याप्रमाणे आरोपीबाबतची हरियाणा येथे जावून माहिती काढून आरोपी विवेक रावत याचे ताव्यातून ०४ रॅडो कंपनीची घडयाळे (कि रु ५,०४,८००/-) जप्त करण्यात आली आहेत. यापुर्वी सदर गुन्हयात १. आशिष कुशल विस्त २. आकाश बालकिशन ढाका ३. रविंदरसिंग अमरजितसिंह सर्व रा. दिल्ली यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, मा पोलीस उप आयुक्त श्री बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी गणेश काळे, सागर घोरपडे, सचिन ढवळे, , सुहास कदम यांनी केली आहे.