मोठी बातमी! वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता

मोठी बातमी! वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता
- Advertisement -

हायलाइट्स:

  • सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता
  • २ जूनपासून कामावरून घरी परतलेच नाही
  • पोलीस तपास सुरू

वसई : वसई-विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव 2 दिवसापासून बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा सगळीकडे शोधण्यात आलं पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

खरंतर, करोनाच्या भीषण संकटात प्रेमसिंग यांच्यावर मोठी जबाबदारी होती. गेल्या एक वर्षापासून ते महापालिकेत करोनाच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं काम करत होते. याचा पदभार हा जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पण ते दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने शहरात भीतीचं वारावरण आहे.

खरंतर, प्रेमसिंग जाधव यांनी शहरात उत्तम कामं केली आहेत. सहाय्यक आयुक्त पदावर राहून त्यांनी शहरातील अनेक अनाधिकृत बांधकाम ही भुईसपाट केली आहेत. त्यामुळे काहींचा त्यांच्यावर राग असेल अशा चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी ते कामावरून घरी जाण्यासाठी निघाले पण पोहोचलेच नाहीत, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

monsoon 2021 : मान्सूनने केरळ व्यापला, येत्या २ दिवसांत महाराष्ट्रात लावणार हजेरी

या प्रकरणात विरार पोलीस ठाण्यात जाधव हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Source link

- Advertisement -