हायलाइट्स:
- सिनेमात काम करणार होता पर्ल वी पुरी
- अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने केला दावा
- आणखी एक पोस्ट करून दिव्याने पर्लला दिला पाठिंबा
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पर्ल वी पुरीसोबत एका म्युझिकल व्हिडीओमध्ये काम केले होते. दिव्याने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत पर्लला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा दिव्याने पोस्ट करत पर्लची बाजू मांडली आहे. या पोस्टमधून दिव्याने पर्ल पुरीला जामिन मिळावा, अशी मागणी केली आहे. जमिनावर तो बाहेर आल्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढू शकेल, असे मत तिने मांडले आहे. तिने पुढे असे म्हटले आहे की, ‘याप्रकरणातून जर पर्ल निर्दोष सुटेल परंतु तोपर्यंत त्याच्या करीअरचे जे नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार असेल?’ त्यानंतर दिव्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘पर्लला एका मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळाले होते. परंतु या प्रकरणामुळे सर्व काही मातीला मिळाले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या करीअरवर होणार आहे. पर्लचे करीअर आताशी सुरू झाले होते. टेलीव्हिजनमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती.’
काय आहे प्रकरण
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप पर्ल वी पुरीवर ठेवला आहे. सध्या पर्ला न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आले आहे. पर्लला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थनासाठी मनोरंजन विश्वातील रुचिका कपूर, मोहित कठुरिया, विकास कालांतरी, एकता कपूर, अनिता हसनंदानी सहीत अनेकांचा समावेश आहे. अनिता आणि एकता यांनी तर पर्लला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या होत्या.