Home ताज्या बातम्या मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक

मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक

0
मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चा
  • मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठक
  • मराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा

मुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत करोना स्थितीबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याचं समजतं. अत्यंत महत्त्वाच्या अशा या भेटीच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. (uddhav thackeray met sharad pawar ahead of meeting with pm narendra modi)

वाचा:‘अजितदादा पत्र चोरत असताना टॉर्च मारण्यासाठी भाजपचे कोण लोक होते?’

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी या भेटीच्या चर्चेला दुजोरा दिला. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा समावेश असेल, असं एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सत्ताधारी व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. विरोधक राज्य सरकारला प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, राज्य सरकारमधील नेते व मंत्री केंद्राच्या असहकार्याकडं बोट दाखवून विरोधकांच्या टीकेला उत्तर देत आहेत. करोनाची स्थिती व मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारमुळंच किचकट झाल्याचा स्पष्ट आरोप राज्य सरकारनं केला आहे. राज्याला देय असलेली जीएसटीची भरपाई देखील केंद्र सरकारनं रोखून धरल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे.

वाचा: मनसुख हिरेन प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणही एनआयएकडे?

Source link