Home ताज्या बातम्या मोदी- ठाकरे दिल्लीत भेटले; महाराष्ट्र भाजपनं बोलावली महत्त्वाची बैठक

मोदी- ठाकरे दिल्लीत भेटले; महाराष्ट्र भाजपनं बोलावली महत्त्वाची बैठक

0
मोदी- ठाकरे दिल्लीत भेटले; महाराष्ट्र भाजपनं बोलावली महत्त्वाची बैठक

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री- पंतप्रधान दिल्लीत भेटले
  • पंतप्रधानांसोबत दीड तास चर्चा
  • भाजपनं महाराष्ट्रात बोलवली बैठक

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- पंतप्रधान यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अशोक चव्हाणसुद्धा उपस्थित होते. दिल्लीत मोदी-ठाकरे भेटीनंतर महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र भाजपनं आज दुपारी ३ वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजपनंही महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप महाराष्ट्र प्राभारी आणि संघटन मंत्री भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर या प्रमुख नेत्यांसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

LIVE : आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुख्यमंत्री ठाकरे व मोदी भेटीनंतर राज्यातत भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री व महाराष्ट्राचे प्रभारी बी.एल. संतोष सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मुंबईत आले आहेत. पंतप्रधान- मुख्यमंत्री यांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वैयक्तिक भेटीसाठी वेळ दिल्यास त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडसाद उमटणार याबाबतही बैठकीत लक्ष वेधणार असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरही या बैठकीत चर्चा होणार का?; याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः भाजपनं ते पत्र व शिवसेनेनं फसवलं यातून बाहेर पडावं; राऊतांचा टोला

Source link