Home गुन्हा मोबाईल हिसकावून घेवून जाणा-या सराईत गुन्हेगार जेरबंद

मोबाईल हिसकावून घेवून जाणा-या सराईत गुन्हेगार जेरबंद

0

पुणे : परवेज शेख मोबाईल हिसकावून घेवून जाणा-या सराईत गुन्हेगारास युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३१/१०/२०१९ रोजी पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते, उत्तम बुदगुडे, सपोफौ वसावे, वाघवले, मोमिन,माने , शेख, खडके असे युनिट-१ चे हधीत पेट्रोलींग करीत असताना श्रीकांत वाघवले व इरफान मोमिन यांना डेक्कन पो स्टे गुन्हा रजि नं १७४/२०१९ भादविक ३९२,३४ मधील पाहिजे आरोपी नामे अली अब्बास शौकत ईराणी हा चोरीचे मोबाईल विकण्यासाठी शिवाजीनगर स्वागत हॉटेल जवळ आलेला आहे. अश्या मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी वरील स्टाफचे मदतीने सापळा लावून अली अब्बास शौकत ईराणी वय २१ वर्ष रा पाटील ईस्टेट, महात्मा गांधी रस्ता,जुना पुणे मुंबई रोड, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ पुणे ५ यास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात कि रु ५०,०००/- चे एकुण ७ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल हँडसेट मिळाले आहे.

नमुद आरोपी यास डेक्कन पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही श्री.अशोक मोराळे सो.,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंग, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे,डॉ. श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंधक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते, उत्तम बुदगुडे, वसावे, वाघवले, इरफान मोमिन, सुधाकर माने, इम्रान शेख, तुषार खडके, योगेश जगताप, रिजवान जिनेडी, बाबा चव्हाण,सुभाष पिंगळे यांनी केली आहे.