मोर्बा दहिवलीत कौटुंबिक वादातून बायको व दोन मुलांची गळा दाबून केली हत्या : माणगांव हादरला

- Advertisement -

बोरघर / माणगाव 🙁 विश्वास गायकवाड ) माणगाव तालुक्यातील मोर्बा विभागातील मौजे दहीवली गावात आपल्याच बायकोला व आपल्या दोन लहान मुलांना गळा दाबून हत्या केल्याची घटना आज दि. 7/11/ 2019 रोजी सकाळी 9 वाजता घडली. हि घटना म्हणजे माणुसकीला काळीबा फासणारी घटना आहें.

माणसाचं हृदय पिटाळूून लावणारी हि घटना आहें
सविस्तर असे कि मौजे दहीवली गावातील संतोष शिंदे रा. दहीवली वय 36 या आरोपीने आपली बायको सुहानी संतोष शिंदे , मोठा मुलगा पवन शिंदे वय 4व लहान मुलगा संचित शिंदे वय 2 मुले यांची रशी च्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत घडली.
सदर आरोपीने आपल्या बायका पोरांना मारुन गावाच्या पोलिस पाटील यांना भेटून मी माझ्या कुटुंबाला ठार मारल्याची कबुली दिली. घरात होणाऱ्या कौटुंबिक वादातून मारल्याचे त्यांनी सांगितले. सदर तिन्ही मृृतदेह शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सदर घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन सदर घटनेचा अधिक तपास पो. नि. अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहें.

- Advertisement -