Home मनोरंजन मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती टॉप, अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना टाकलं मागं

मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती टॉप, अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना टाकलं मागं

0
मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्ती टॉप, अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना टाकलं मागं

[ad_1]

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव चर्चेत आले होते. तिच्याबद्दल कितीही नकारात्मक गोष्टी समोर आल्या असल्या तरी रिया ‘द टाइम्स’च्या ‘द मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०‘ च्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत वर्षभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले, अशा महिलांच्या नावाचा यादीत समावेश केला जातो. यादीमध्ये दीपिका पादुकोण, दिशा पाटनी, कतरिना कैफ यांसारख्या तगड्या अभिनेत्रींवर मात करत रियाने पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.

गेल्यावर्षी रिया चक्रवर्ती सातत्याने बातम्यांमध्ये होती. अर्थात तिच्या नावाची चर्चा नकारात्मक गोष्टींसाटीच जास्त झाली. सुशांतच्या कुटुंबाने रियावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी रियाला तुरुंगातही जावे लागले होते. सध्या रिया जामिनावर बाहेर आहे.


टॉप टेनच्या यादीत यांचा समावेश

गेल्या वर्षातील म्हणजे २०२० मधील जगातील ५० डिझायरेबल महिलांच्या यादीमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरी आलेली स्पर्धक एडलिन कॅस्टोलिने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिशा पाटनीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. कियारा आडवाणी, दीपिका पादुकोण, कतरीना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, अनुप्रिया गोएंका, रुही सिंह आणि अवित्री चौधरी अनुक्रमचे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.


यादीमध्ये याही अभिनेत्रींचा समावेश

जगातील ५० मोस्ट डिझायरेबल महिलांच्या यादीमध्ये अनुजा जोशी, श्रेया चौधरी, नेहा जयस्वाल, त्रिधा चौधरी, श्रेया पिळगावकर, श्रेया धनवंतरी, अलाया फर्नीचरवाला, कल्याणी प्रियदर्शन यांचाही समावेश आहे.



[ad_2]

Source link