Home शहरे कोल्हापूर मोस्ट वांटेड टोळीला अटक; बंदूकाही केल्या जप्त

मोस्ट वांटेड टोळीला अटक; बंदूकाही केल्या जप्त

0

कोल्हापूर:राजस्थानमधील मोस्ट वांटेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. या टोळीच्या राजस्थान पोलीस मागावर असल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास जोधपूरमध्ये हैदोस घालू असा इशारा या धमीकद्वारे दिला होता. दरम्यान, 25 पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या या टोळीच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी रात्री किणी टोल नाक्यावर पोलीस आणि गुंडांच्यात धुमश्चक्री उडाली. यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन गुंडांवर पोलिसांनी गोळीबार करत त्यांना ताब्यात घेतले. सुमारे 30 मिनिटात पोलिसांनी जीवावर उदार होत ही कामगिरी केली असून सर्वत्र पोलीसांचे कौतुक होत आहे.