नवी दिल्ली : मासिक वेतनाबाबत बोलणी अयशस्वी झाल्यानंतर बँक युनियनने संपाची घोषणा केली आहे. इंडियन बँक असोसिएशन(IBA) नं या महिन्यात दुसऱ्यांदा बँक संपाचं आव्हान केलं आहे. आयबीएकडून 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी बँकेचा संप असणार आहे. 8 तारखेला भारत बंदचं आव्हान करण्यात आलं होतं. यात 6 बँक कर्मचारी युनियनचा सहभाग होता. या दिवशी बहुतांश बँका बंद होत्या. ज्या बँका सुरू होत्या त्यांच्या कामकाजावर परिणाम झाला होता.
यावेळचा संपाचा दिवस महत्त्वाचा आहे कारण 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंदीचा सामना करण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकारसमोर आहे.
3 दिवस बँका बंद राहणार
31 जानेवारी 2020 रोजी शुक्रवार आहे. 1 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. 2 तारखेला रविवार आहे. त्यामुळे बँका तीन दिवस बंद असतील. बँका तीन दिवस बंद असल्यानं एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाल्यानंतर बँकिंग सेवेवर याचा परिणाम होणार आहे. या दिवशी नेट बँकिंग सामान्यपणे काम करण्याची शक्यता आहे. कारण आता नेट बँकिंग 24×7 उपलब्ध आहे.