हायलाइट्स:
- सोनम कपूर स्वतः करते घरातील सगळी कामं
- लंडनमध्ये कामासाठी माणसं मिळत नाहीत
- स्वतःच्या घरातील काम करून मिळणारा आनंद अनुभवतेय सोनमa
मुख्यमंत्र्यांना ही कळकळीची विनंती… निवेदिता सराफ यांनी शेअर केला व्हिडिओ
सोनमने २०१८ साली आनंद अहुजा सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सोनम लंडनला शिफ्ट झाली होती. सोनम फार कमी काळासाठी मुंबईत येते. भारतात जरी सोनम अभिनेत्री असली तरी लंडनमध्ये मात्र तिचं आयुष्य अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहे. लंडनमध्ये घरातील सगळी कामं सोनम स्वतः करते. भारताप्रमाणे लंडनमध्ये मदतनीस मिळत नसल्याने सोनम घरातील केर काढणे, फरशी पुसणे, जेवण बनवणे अशी सगळी कामं करते. मुलाखतीत सोनम म्हणाली, ‘मला इथलं स्वातंत्र्य खूप आवडतं. मी माझं जेवण स्वतः बनवते, माझं घर साफ करते, घरातलं सगळं सामानही मी स्वतः खरेदी करते.मला हे सगळं फार आवडतं.’
आनंदसोबतच्या आयुष्याबद्दल सांगताना सोनम म्हणाली, ‘मी स्वतःला एक प्रवासी समजते जी लंडनमध्ये आहे. मी तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरते. मी रोज रात्री माझ्या पतीसोबत जेवायला बसते जे मी बनवलेलं असतं. आम्ही सोबत टीव्ही बघतो. कधीकधी टीव्ही चॅनेलवरून आमच्यात वादही होतात.’ काही दिवसांपूर्वी सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला भारताची आणि तिच्या घराची आठवण येत असल्याचं म्हटलं होतं. सोनम शेवटची ‘द झोया फॅक्टर’ चित्रपटात झळकली होती.
१४ वर्षांनंतरही ‘वेलकम’ मधील ‘या’ अभिनेत्याला मिळालं नाही मानधन