Home बातम्या आंतरराष्ट्रीय म्हणून सरकार सर्वांना देणार प्रत्येकी ९२ हजार रुपये

म्हणून सरकार सर्वांना देणार प्रत्येकी ९२ हजार रुपये

0

गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचा फटका हॉंगकाँगलाही बसला आहे. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने हाँगकाँगमध्ये मंदीसदृष्य वातावरण आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी हाँगकाँग सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हाँगकाँग सरकारने ७० लाख स्थानिक नागरिकांना प्रत्येकी १२०० डॉलर्स म्हणजेत तब्बल ९२ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
हाँगकाँगचे वित्तमंत्री पॉल चॅन यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली आहे.
आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी एकूण १२० अब्ज हॉंगकाँग डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना रोख मदत केल्याने देशाच्या तिजोरीवर ७१ अब्ज हाँगकाँग डॉलरचा भार पडणार आहे.
मात्र जनतेला देण्यात येणारी रक्कम लोकांकडून खर्च करण्यात येईल. त्यामुळे व्यवहार होऊन बाजारात तेजी येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करण्यासाठी हाँगकाँग सरकारने हा हटके मार्ग स्वीकारला आहे.
आता या उपायामुळे हाँगकाँगच्या अर्थव्यवस्तेत नेमके काय सकारात्मक बदल होतात ते पाहावे लागेल.