
मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सावर येथे युनानी महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु या जागेत क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम झाले असल्याने ही जागा महाविद्यालय उभारणीसाठी पुरेशी नाही. त्यामुळे सरवर येथे महाविद्यालय उभारण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
मंत्रालयात युनानी वैद्यकीय महाविद्यालय, म्हसळा जि. रायगड येथील अडचणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक अजय चंदनवाले, आयुष संचालनालयाचे संचालक रमण घोंगळारकर उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, तात्पुरत्या स्वरूपात शासकीय रिकाम्या इमारतीत किंवा भाडेतत्त्वावरील जागेत महाविद्यालय सुरु करण्यात यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.
सरवर येथील जागा महसूल विभागाने सुचविली असून त्यास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सहमती दर्शविली.
000
मोहिनी राणे/स.सं