मुंबई : ‘गाथा नवनाथांची’ ही नुकतीच सुरु झालेली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आजवर गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेतील येत्या काही भागांत सर्वश्रुत असलेली मच्छिंद्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी ‘जय मल्हार’ मालिकेत सुरभीने साकारलेली म्हाळसाची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरभी या भूमिकेच्या माध्यमातून टीव्हीवर पुनरागमन करत आहे.
- Advertisement -