Home ताज्या बातम्या यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करूयात

यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करूयात

0

यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करूयात

दिव्यांचा, आनंदाचा, स्नेह-प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे दिवाळी. नवीन कपड्यांची रेलचेल, सकाळ-संध्याकाळी नवे-नवे गोड पदार्थ, रात्री लख्ख प्रकाशाची आरास व सोबत फटाक्यांचा आवाज, असे एकूण चित्र दिवाळीत सर्वत्र दिसून येते. 

मात्र अतितिव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायम स्वरूपी बहिरेपण देवून जातात. तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व देवून जातात. त्यामुळे दिवाळी ध्वनी प्रदुषण मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणूनच आपण यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करूयात.

दिवाळी साजरी करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही.

ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठया संकटास आपण आमंत्रण देतो. फटाके पेटवल्याने प्रदूषणातही भरच पडते. वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर 125 डेसिबल पेक्षाही मोठया प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय.

तरीही काही माणसं मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्या व्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता असते.

सर्व प्राणीमात्रांसाठी, व्यक्तींसाठी तसेच पर्यावरणासाठी दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकून पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. मित्रांनो, यंदा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयत्न करूयात…!