Home ताज्या बातम्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

0

   मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे.  या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

          तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.