हायलाइट्स:
- घटस्फोटानंतर किरण आणि आमिर दिसले एकत्र
- लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या सेटवरचा फोटो व्हायरल
- किरण आणि आमिर दिसले कूल अंदाजात
चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने काही हॅशटॅग वापरले आहेत. त्यामध्ये त्याने आमिर खान प्रॉडक्शनचे आभार मानले आहेत.आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट घेतला हे जाहीर केल्यानंतर त्यांचा हा पहिला एकत्र फोटो आहे. यावरून हे नक्की झाले आहे की व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींचा परिणाम या दोघांनीही त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यावर होऊ दिलेला नाही.
हिंदी सिनेमातील सुपरस्टार आमिर खाननं त्याच्या दुस-या बायकोला किरण रावला घटस्फोट दिलाआहे. या दोघांनी ३ जून रोजी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यांचा हा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय जाहीर केल्यानंतर या दोघांचा एकत्रित व्हिडीओ इंटरव्ह्यू झाला होता. त्यामध्ये आमिरने सांगितले की, ‘तुम्हा सगळ्यांना दुःख झाले असेल,धक्का बसला असेल, परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या नात्यात बदल झाला असला तरी आम्ही एक कुटुंब म्हणूनच आहोत. आम्ही एक दुस-यासोबतच आहोत. पाणी फाऊंडेशन हे देखील आझादप्रमाणेच आमचे मूल आहे. आम्ही कायम एक कुटुंब आहे. तुम्ही सर्वजण आमच्या आनंदासाठी प्रार्थना करा.बस इतकेच आम्हाला सांगायचे आहे…’
किरण रावशी लग्न करायच्या आधी आमिर खानने १९८६ मध्ये रिना दत्तासोबत लग्न केले होते. आमिर आणि रीनाची जुनैद आणि आइरा ही दोन मुले आहेत. रीना आणि आमिर यांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावसोबत लग्न केले. या दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे.