या अभिनेत्याने सहा वर्षांच्या अफेअरनंतर केले होते गुपचूप लग्न

- Advertisement -

अभिनेता कुणाल जयसिंहने आता छोट्या पडद्यावर त्याचे प्रस्थ निर्माण केले असून त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मन की आवाज प्रतिज्ञा या मालिकेद्वारे कुणालने त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली होती. आज म्हणजेच २९ जुलैला कुणालचा वाढदिवस असून त्याचा इश्कबाज, दिल बोले ऑबेरॉय, द बडी प्रोजेक्ट यांसारख्या अनेक मालिका गाजल्या आहेत. कुणालने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला द बडी प्रोजेक्ट  या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेली रणवीर शेरगिलची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आले. या मालिकेनंतर तो आशिकी, प्यार तूने क्या किया, सावधान इंडिया यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिकांमध्ये झळकला. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता इश्कबाज या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेसाठी त्याला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.  द बडी प्रोजेक्ट या मालिकेने कुणालला एक ओळख मिळवून दिली. पण त्याचसोबत या मालिकेने त्याच्या आयुष्याला एक खूप छान वळण दिले. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्याची ओळख भारती कुमारसोबत झाली. भारती देखील या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत होती. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी जवळजवळ सहा वर्षं एकमेकांना डेट केले. सुरुवातीला त्यांनी आपले नाते मीडियापासून लपवून ठेवले होते. अखेरीस २०१२ मध्ये त्यांनी आपले नाते मीडियात मान्य केले. त्यांच्या नात्याबाबत मीडियात कुणालने सांगितले होते की, माझ्या आणि भारतीच्या नात्याबाबत आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमच्या पालकांना सांगितले होते. त्यानंतर आम्ही मीडियात आमच्या नात्याची कबुली दिली होती.अफेअरच्या अनेक वर्षांनंतर त्या दोघांनी २० डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. त्या दोघांनी अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. या लग्नाला केवळ त्याचे कुटुंबिय, जवळचे नातलग आणि मित्रमैत्रीण उपस्थित होते. भारतीने देखील यम है हम, हमसे है लाईफ आणि ईशा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

 

- Advertisement -