Home बातम्या आंतरराष्ट्रीय या तारखेपासून भारतीय जहाजांवर सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी

या तारखेपासून भारतीय जहाजांवर सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी

0

डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगने (डीजीएस) जहाजांवर प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. 1 जानेवारीपासून भारतीय जहाजांवर अनेक प्रकारच्या सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीएसच्या नवीन नियमांनुसार भारती जलक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या परदेशी जहाजांना देखील अशा उत्पादनांची माहिती सरकारला द्यावी लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यावर अटक देखील केली जाऊ शकते.

भारतीय जहाजांवर प्लास्टिकपासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्या, बॅग, ट्रे, कंटेनर, फूड पॅकेजिंग फिल्म, फ्रिजर बॅग, आइस्क्रीन कंटेनर, हॉट ड्रिंक कप आणि शॉपिंग बॅगचा उपयोग करता येणार नाही. 10 लीटरपर्यंतची पाण्याची बाटली घेऊन जाण्याची परवानगी आहे. चिप्सचे पॉकिट, सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेल्या प्लेट आणि भांड्यांवर देखील बंदी आहे.

डीजीएसने आंतरराष्ट्रीय रिपोर्टचा संदर्भ देत सांगितले की, समुद्रांच्या तटावर सफाई दरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळते. सिंगल यूज प्लास्टिक माती, नदी आणि पाण्याच्या स्त्रोतांना दुषित करते. प्लास्टिक समुद्रासाठी देखील धोकादायक ठरत आहे. काही वैज्ञानिकांचा दावा आहे की, 2050 मध्ये समुद्रात प्लास्टिकची संख्या माशांपेक्षा अधिक होईल.