हायलाइट्स:
- पावसाची अक्कल काढत केदार शिंदेचा बीएमसीला टोला
- पहिल्याच पावसाच मुंबई तुंबली
- रस्ते वाहतूक आणि लोकल सेवाही झाली होती विस्कळीत
केदार शिंदे हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक घडामोडींवर केदार आपल्या मार्मिक शैलीमध्ये मत व्यक्त करत असतात. आजच्या पावसामुळे तुंबलेल्या मुंबईच्या परिस्थितीवर देखील त्यांनी असेच मार्मिक भाष्य केले आहे. केदार म्हणाले, ‘ या पावसाला एक अक्कल नाही. केवल ५ मी. मी. पर्यंत संरक्षणाची व्यवस्था #bmc ने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो.. ‘ अशा शब्दांत त्यांनी मुंबईची आजची स्थिती सांगितली आहे. ही स्थिती सांगताना त्यांनी #MumbaiRains #मुंबई-तुंबई असे हॅश टॅग वापरले आहेत.
दरम्यान, पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर असल्याने मुंबई तसेच उपनगरात अनेक सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल झाले. लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचले. ट्रॅक पाण्याखाली गेल्याने आणि कुर्ला आणि सायन स्थानकांतही भरपूर पाणी भरल्याने या ठिकाणची लोकल वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना पहिल्याच पावसाने अतोनात त्रास सहन करावा लागला. मुंबई महानगर पालिकेवर अशा भोंगळ कारभारावर अनेकांनी टीकाही केली.