मुंबई : आपल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतात अनेक प्रोडक्ट लाँच करत आहे. रेडमी के20 सीरिजचे स्मार्टफोन या महिन्यात कंपनी भारतात लाँच करणार आहे. कंपनी यासोबतच शाओमी रेडमी 7A पण लाँच करत आहे.
विशेष म्हणेज येत्या 15 जुलै रोजी आपला वायरलेस इअरफोनही शाओमी लाँच करणार आहे. नुकतेच शाओमीने Mi Beard Trimmer भारतात लाँच केले. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन इंडियाच्या लिस्टिंगनुसार शाओमीचे हे इअरफोन अॅमेझॉन प्राईम डेला मिळणार आहेत. 15 जुलैपासून अॅमेझॉन प्राईम डेची सुरुवात होणार आहे.
कंपनी यासोबतच या महिन्यात के20 सीरीज आणि हेडफोन्ससह फास्ट चार्जर आणि Mi LED लॅम्पही लाँच करत आहे. येत्या 4 जुलै रोजी शाओमी भारतात रेडमी 7ए लाँच करत आहे. शाओमीच्या या इअरफोन्समध्ये विशेष काय असेल याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. अमेझॉन लिस्टिंगनुसार शाओमीचा हा वायरलेस इअरफोन बेस लव्हर्ससाठी तयार करण्यात आला आहे आणि हा इअरफोन्स रेंजसह फास्ट कनेक्टिव्हिटी देतो.
वनप्लस 7 प्रोला टक्कर देण्यासाठी कंपनी रेडमी के20 सीरीज भारतात लाँच करत आहे. कंपनीने टीजर प्रदर्शित करत म्हटले की, शाओमी रेडमी के20 प्रो जगातील सर्वात जलद स्मार्टफोन आहे. हा फोन चीनमध्ये लाँच झाला असून त्यानंतर फक्त महिन्याभरात रेडमी K20 चे 10 लाख स्मार्टफोन विकले जातील, असा दावा कंपनीने केला आहे.