Home मनोरंजन ‘या’ स्टार कलाकारांनी दिला होता ‘तारक मेहता…’ मधील जेठालालच्या भूमिकेसाठी नकार

‘या’ स्टार कलाकारांनी दिला होता ‘तारक मेहता…’ मधील जेठालालच्या भूमिकेसाठी नकार

0
‘या’ स्टार कलाकारांनी दिला होता ‘तारक मेहता…’ मधील जेठालालच्या भूमिकेसाठी नकार

[ad_1]

हायलाइट्स:

  • गेली ११ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे मालिका
  • मालिकेतील सर्वाधिक आवडत्या पात्रांपैकी एक आहे जेठालाल
  • जेठालालच्या भूमिकेसाठी आणखी पाच अभिनेत्यांना झाली होती विचारणा

मुंबई– छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या हलक्या- फुलक्या विनोदाने मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतं. मालिकेतील सर्व कलाकार आपापली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आले आहेत. परंतु, त्यातही प्रेक्षकांना मालिकेतील सगळ्यात जास्त आवडणारं पात्र म्हणजे जेठालाल. जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी त्यांच्या अभिनयाने पात्राला चार चाँद लावले. परंतु, दिलीप यांच्याआधी जेठालालच्या भूमिकेसाठी आणखी पाच कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, त्यांनी हे पात्र करायला नकार दिला. पाहूया कोण आहेत ते कलाकार.

करिष्मा कपूरनं सांगितलं सुनील शेट्टीचं एक मोठ्ठं सिक्रेट; ऐकून सगळेच झाले

योगेश त्रिपाठी

‘भाभीजी घर पर हैं?’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारे अभिनेते योगेश त्रिपाठी यांना जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, इतर मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला.


किकू शारदा

‘द कपिल शर्मा शो’ मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता किकू शारदा याला जेठालालच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. परंतु, पूर्णवेळ मालिका करायची नसल्याचं सांगत त्याने भूमिकेसाठी नकार दिला.


एहसान कुरेशी

स्टॅण्डअप कॉमेडीयन एहसान कुरेशी यांनादेखील जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. त्याच्या नकारामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

AssignmentImage-1838033627-1626426269


अली असगर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेल्या अली असगरला देखील जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, इतर कार्यक्रमात व्यग्र असल्याने त्याने कार्यक्रमाला नकार दिला. अलीने ‘कहानी घर घर की’, ‘कुटूंब’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ सारख्या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे.


राजपाल यादव

बॉलिवूडमधील उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि कॉमेडियन अशी ओळख असणाऱ्या राजपाल यादवला देखील जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, बॉलिवूडसोडून छोट्या पडद्यावर काम करण्यास तयार नसल्याने राजपालने या भूमिकेला नकार दिला.


VIDEO: ब्रिटिनच्या शाही दाम्पत्याकडं दुर्लक्ष केल्यानं प्रियांका होतेय ट्रोल



[ad_2]

Source link