हायलाइट्स:
- नीना गुप्ता त्याचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’मुळे आहेत चर्चेत
- आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर नीना यांनी घेतली गीतकार गुलजार यांची भेटी
- गुलजार यांच्या भेटीच्या वेळी घातलेल्या ड्रेसमुळे नीना गुप्ता झाल्या ट्रोल
नीना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या आपलं पुस्तक गुलजार यांना गिफ्ट करताना दिसत आहे. यावेळी त्या शॉर्ट ड्रेस घातला होता. त्यांच्या याच ड्रेसवरून त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. याबाबत इ-टाइम्सशी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मला समजत नाही की जेव्हा कोणी मला ट्रोल केलं जात आहे असं लिहितो. तेव्हा त्याचा अर्थ नक्की काय असतो? याचा अर्थ असा तर नाही की, खूप सारे लोक माझ्यावर टीका करत आहेत. पण तुम्ही पाहा की, किती लोकांनी माझं कौतुकही आहे. मग अशात मला २-४ लोकांची काळजी करायला हवी का?’
नीना यांना यावेळी, ‘तुमच्यावर टीका करणाऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?’ असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, ‘का? माझ्यावर टीका करणाऱ्या २-४ लोकांना मी जास्त महत्त्व का देऊ. जेव्हा माझं कौतुक करणारे लोक त्यामानाने जास्त आहेत.’
नीना यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि राकुलप्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका होत्या. याशिवाय त्या परिणिती चोप्राचा चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’मध्येही दिसल्या होत्या. सध्या त्या ‘गुडबाय’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. ज्यात त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत.