सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का) : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून १८००११८७९७ हा टोल फ्री क्रमांक तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ०२३६२-२२८८४७ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.
नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली
फ़ोन-टोल फ्री 1800118797
फोन – 011-23012113/23014104/ 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल- [email protected]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी/ संबंधितांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या ०२३६२-२२८८४७ या हेल्पलाईन क्रमांकावर आणि टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधून माहिती द्यावी.
०००