Home गुन्हा युटयुबवर ज्योतिष शास्त्राविषयी खोटी जाहीरात टाकुन पाहिलेची फसवणुक करणाऱ्या अटक

युटयुबवर ज्योतिष शास्त्राविषयी खोटी जाहीरात टाकुन पाहिलेची फसवणुक करणाऱ्या अटक

0
  • पुणे : परवेज शेख

कोंढवा, पुणे येथे राहणाऱ्या मध्यम वयातील महिलेने युटयुब या सोशल साईडवर ज्योतिष शास्त्राविषयी जाहीरात पाहीली. घरात सतत भांडणे व क्लेश चालु असल्याने सदर महिलेने घरातील भांडणे व क्लेश दुर करण्यासाठी युटयुब या सोशल साईडवर ज्योतिष शास्त्रा जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने मी मोहम्मद अली ज्योतिषी बोलत असे सांगितले. त्यावर पिडीत महिलेने तिच्या कौटुंबिक अडचणीबाबत संबधित ज्योतिषीस सांगितले असता समोरील व्यक्तीस ” तुम पर काला जादु है” असे सांगुन भिती घातली. उपाय म्हणुन महापुजा, होमहवन, व बळी असे वेगवेगळी कारणे सांगुन त्यासाठी वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडून पिडीत महिलेची एकुण १,०६,०००/- रुपयांची फसवणुक केली. समोरील ज्योतिषी यांरवार पैशांची मागणी करु लागल्याने व पिडीत महिलेच्या जिवनात कोणत्याही प्रकारचा फायदा न झाल्याने तिची फसवणुक झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने सायबर पोलीस स्टेशन गु.र.न. १४/२०१९ भादवि सह ४१९.४२० अन्वये तक्रार दिली।

सदरची कामगिरी श्री. संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, श्री. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, श्री. जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र गवारी, पोलीस उप-निरीक्षक, कर्मचारी अस्लम अत्तार, शिरीष गावडे, हर्षल दुसाने, शुभांगी मालुसरे यांनी केली.