युद्धनौका आणि पाणबुडी भारतीय जल सीमेजवळ दिसून आली; भारताच्या पाळत ठेवणाऱ्या विमानाने चिनी युद्धनौकाचे काढले फोटो
हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या दरम्यान, भारतीय नौदलाला जलसीमेजवळ एक चीनी युद्धनौका आणि पाणबुडी दिसून आली आहे. भारतीय जलसीमेजवळ पेट्रोलिंग दरम्यान नुकताच शोध घेण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या गस्त घालण्याच्या वेळेदरम्यान भारताच्या पाळत ठेवणाऱ्या विमानाने चिनी युद्धनौकाचे फोटो काढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने भारतीय जलसीमेमधून जाणाऱ्या सर्व व्यावसायिक आणि युद्धनौकांवर देखरेख ठेवली आहे.
चीनच्या लढाऊ जहाज झियान आणि क्षेपणास्त्र फ्रिगेटचे फोटो नौदलास प्राप्त झाले आहे. हे फोटो पी-मेरीटाईम पाळत ठेवणाऱ्या विमानाने काढले आहे. या जलवाहतुकीवर भारताचे वर्चस्व असल्याने हिंद महासागरात प्रवेश करणाऱ्या सर्व जहाजांवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष असते. चिनी जहाजाशिवाय नौदलाच्या गस्त घालणाऱ्या विमानाने अणु पाणबुडीचा मागोवा घेतला आहे. अहवालानुसार, चीनची जहाजे मालाक्का सामुद्रधुनीमार्गे हिंद महासागरात घुसली आहेत. त्यामुळे नौदलाने या क्षेत्रावर आपले बारिक लक्ष ठेवले आहे. तसेच संबंधित संरक्षण विभागांना सतर्क राहण्यासही सांगितले आहे.