युनियन बँकेची ७३ टक्के नफावृद्धी

- Advertisement -

नवी दिल्ली :
सरकारी क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये ७३ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. जूनअखेरच्या तिमाहीत या बँकेने २२४ कोटी रुपये नफ्याची नोंद केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत या बँकेला १२९ कोटी रुपये नफा झाला होता.या तिमाहीत बँकेच्या एकूण उत्पन्नाचा आकडा ९,८८७ कोटी रुपयांवर पोहोचला. बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेत (एनपीए) किंचित घट झाली आहे. यानुसार बँकेची ढोबळ बुडीत कर्जे १६ टक्क्यांवरून १५.१८ टक्क्यांपर्यंत (४८,८४१ कोटी रुपये) घसरली आहेत. तर, निव्वळ बुडीत कर्जे ८.७ टक्क्यांवरून ७.२३ टक्क्यांपर्यंत (२१,२३० कोटी रुपये)घसरली. 

- Advertisement -