Home अश्रेणीबद्ध येरवडा कारागृहात हिंदू राष्ट संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीरवर खुनी हल्ला

येरवडा कारागृहात हिंदू राष्ट संघटनेचा कट्टर संघटक तुषार हंबीरवर खुनी हल्ला

पुणे:येरवडा येथे सकाळी सातच्या सुमारास खुनातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली. या घटनेत शाहरुख शेख या आरोपीने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषार हंबीर या कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्यांनी वार करून त्याला गंभीर जखमी केले. तुरुंग प्रशासन व पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेल्या तुषार हंबीरवर शाहरुख शेख याने खिळ्याने वार केले. हंबीर हा हिंदू संघटनेचा संघटक असून तो हडपसर येथील मोहसीन शेख खुनातील आरोपी आहे.या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या  हंबीर याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ तुरुंग आणि पोलीस दाखल झाले आहे. ही घटना घडल्यावर तुरुंग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे या घटनेने कारागृह परिसरात खळबळ माजली आहे. तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंग प्रशासनाकडून घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली