Home ताज्या बातम्या येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन पाहणी- सुनील फुलारी (अपर पोलीस आयुक्त पूर्व)

येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन पाहणी- सुनील फुलारी (अपर पोलीस आयुक्त पूर्व)

0

आज रोजी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व सुनील फुलारी साहेबांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानकपणे भेट दिल्याने येरवडा पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. त्याप्रसंगी माननीय सुनील फुलारी साहेब यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख व अजय वाघमारे उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी सदरील येरवडा पोलीस स्टेशन मधील शासकीय कामकाजाबाबत ची सर्व माहिती फुलारी साहेबांना देऊन व परिसर दाखवला. फुलारी साहेब यांनी येरवडा पोलीस स्टेशनला भेट दिल्याबद्दल त्यातील कर्मचारी व पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अचानक येरवडा पोलिस स्टेशनला भेट दिल्यामुळे येथील नागरिकांना पोलीस प्रशासना कडून सदैव सुरळीत व जलद गतीने लोकांच्या असलेल्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन देखील त्यांनी दिले. अपर पोलीस आयुक्त पूर्व सुनील फुलारी साहेबांचे कर्मचारी वृंदा कडून अभिनंदन करण्यात आले.

तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी साहेब यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार यांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. वृक्षारोपण पर्जन्य जलसंचय शेततळी यामध्ये लोकसहभागातून भरीव काम केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले फुलारी साहेब यांनी येरवडा पोलीस स्टेशनला भेट दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.