येरवड्यात अल्पवयीन युवकाचा चार वर्षांच्या बालिकेवर लैगिंक अत्याचार

- Advertisement -

पुणे : खाऊचे आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेवर सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार येरवड्यात शुक्रवारी घडला.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन युवकाविरूध्द बलात्कारासह बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो)गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. 
पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवार (दि.20) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून येरवडापोलिसांना मिळाली होती.येरवडा पोलिसांनी  तात्काळ घटनास्थळी जावून बालिकेच्या पालकांकडून माहिती घेतली असता तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला असल्याची माहिती मिळाली. याच वेळी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या  अल्पवयीन युवकाला देखील ताब्यात घेण्यात आले.
पीडित बालिकेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घराजवळच राहणाऱ्या युवकाच्या घरी पीडित बालिका व तिची मैत्रीण खेळण्यासाठी गेले होते. सोबतची मैत्रीण बाहेर गेल्यावर त्या युवकाने खाऊ देण्याचा बहाणा करून चिमुकलीवर लैगिंक अत्याचार केला.या दुर्दैवी घटनेनंतर पीडित बालिकेने रडत घरी जाऊन पालकांना हा गंभीर प्रकार सांगितला. पालकांनी नियंत्रण कक्षाकडून पोलिस मदत घेऊन अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन युवकाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गिरमकर करीत आहेत.

- Advertisement -