हायलाइट्स:
- अनेक हिट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सिद्धार्थने केलं आहे काम
- यूट्यूब व्हिडीओने दिली आहे सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी
- यूट्यूबकडे तक्रार केल्यानंतरही सिद्धार्थच्या पदरी निराशा
‘शो साइन करण्याआधी तुला…’ निक्कीवर भडकला रोहित शेट्टी
सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये यूट्यूब व्हिडिओचा एक स्क्रिनशॉट शेअर करत चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली. सिद्धार्थने लिहिलं, ‘व्हिडिओत म्हंटलं आहे की, माझा मृत्यू काही वर्षांपूर्वीच झाला आहे. या व्हिडिओबद्दल मी यूट्यूबकडे तक्रारदेखील केली आहे. परंतु, यूट्यूबकडून मला अजबच उत्तर मिळालं. यूट्यूब म्हणतंय की, आम्हाला या व्हिडिओत कोणतीही चूक आढळून आलेली नाही.’ सिद्धार्थने उल्लेख केलेल्या व्हिडिओत अशा कलाकारांबद्दल माहिती देण्यात आली आहे ज्याचा मृत्यू तरुणपणी झालेला आहे. यात सिद्धार्थचंदेखील नाव आहे.
घडल्या प्रकारावर नेटकऱ्यांनीही सिद्धार्थच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर यूट्यूब आपली चूक सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थने ‘रंग दे बसंती’ सोबत ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शेवटचा २०१९ सालच्या ‘आरुवं’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकला होता. लवकरच सिद्धार्थ आणखी काही चित्रपटात झळकणार आहे. त्यात ‘इंडियन २’, ‘टक्कर’, शैतान का बच्चा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

























WhatsApp