हायलाइट्स:
- ‘बँड बाजा बारात’च्या वेळी करण जोहरनं रणवीरच्या लुकवर केली होती कमेंट
- करण जोहरनं आदित्य चोप्राला दिला ‘बँड बाजा बारात’मध्ये रणवीरला न घेण्याचा सल्ला
- ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहरनं मागितली होती रणवीर सिंहची माफी
करण जोहरनं त्याचा चॅट शो ‘कॉफी विथ करण‘मध्ये सांगितलं होतं की, जेव्हा त्यानं पहिल्यांदा रणवीरला पाहिलं होतं तेव्हा त्याचा लुक पाहून तो त्याला अजिबात आवडला नव्हता आणि त्यानं आदित्य चोप्राला हा अजिबात गुड लुकिंग नाहिये असं म्हटलं होतं. आपल्या शोमध्ये करण म्हणाला, ‘मी रणवीरला आदित्य चोप्राच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं.तेव्हा तो तिथे टेबल टेनिस खेळत होता.’
करण जोहरशी बोलताना आदित्य चोप्रा त्याला म्हणाला, ‘यात जो नवीन मुलगा आहे ना तो ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट करत आहे.’ त्यावर करण त्याला म्हणाला, ‘ते सर्व ठीक आहे पण तो कसा दिसतोय बघ अजिबात गुड लुकिंग नाही आहे.’ त्यानंतर करणनं जेव्हा पहिल्यांदा रणवीरला स्टुडिओमध्ये पाहिलं तेव्हाही त्याला रणवीर आणि अनुष्का या चित्रपटासाठी योग्य आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. एवढंच नाही तर करणनं या चित्रपटाच्या पोस्टरवरही आक्षेप घेत ते बदलण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला, ‘तू हे पोस्टर बदल नाहीतर हा चित्रपट पाहायला कोणीच येणार नाही.’
करणच्या बोलण्यावर आदित्य चोप्रानं त्याला म्हटलं, ‘तू प्रोमो पाहा आणि नंतर आपण यावर बोलू.’ त्यानंतर करणनं हा चित्रपट पाहिला आणि त्याला या चित्रपटासाठी रणवीर आणि अनुष्काची जोडी आवडली. नंतर स्वतःचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये स्वतःच्या चुकीसाठी करणनं रणवीरची माफी सुद्धा मागितली होती.