रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले कौतुक – महासंवाद

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले कौतुक – महासंवाद
- Advertisement -




कौशल्य विकासमंत्री मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी

कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकरशिक्षक व विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

मुंबई, दि.२१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कौतुक केले असून विद्यापीठाला एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. राजभवनात हिमाचल प्रदेश स्थापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिमाचल प्रदेशाच्या पारंपरिक नृत्याची प्रशंसा त्यांनी केली.

राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या हिमाचल प्रदेश स्थापना दिवसाचा कार्यक्रम रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय केला. हिमाचल प्रदेशातील नाटी हे पारंपरिक नृत्य तालबद्ध  विशिष्ट कलाविष्काराचा सुंदर नमुना असून या नृत्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आधीच मध्ये नोंद करण्यात आली आहे. हेच नृत्य रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या खारघर येथील केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. वाद्यांच्या तालावर  एका सुरात होत असलेल्या तालबद्ध पदविन्यास हे या नृत्याचे वैशिष्ट असून विद्यार्थ्यांनी अतिशय रंगतदार नृत्य सादर केले. सामूहिक कलेचा हा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. हे विद्यार्थी केवळ तंत्रज्ञानातच नाही तर भारतीय परंपरेतील कलेतही कौशल्य दाखवत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी केवळ नाटी नृत्यच नाही तर हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध लुडी, पांगी आणि बिलासपुरी पारंपरिक नृत्यही सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. खारघर सोबतच पुणे येथील केंद्रातील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला.

दरम्यान, रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना राज्यपालांनी घोषित केलेल्या पारितोषिकाबाबत कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी आनंद व्यक्त केला आहे.   विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून भारतीय परंपरा आजही नव्या पिढीत कायम असल्याचे सिद्ध केले आहे, या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

त्याचबरोबर या कलाविष्कारात विद्यार्थ्यांना सहाय्य करणारे शिक्षक आणि प्रशिक्षक यांचेही कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनीही विद्यार्थ्याचे अभिनंदन केले असून राज्यपालांच्या पारितोषिक आणि प्रोत्साहनामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला असून यापुढे विविध क्षेत्रात विद्यार्थी आपले कलागुण दाखवतीलच त्याचबरोबर नृत्यातील सामूहिक भाव त्यांना आयुष्यात आणखी पुढे घेऊन जाईल असा विश्वास पालकर यांनी व्यक्त केला.

0000

संध्या गरवारे/विसंअ/







- Advertisement -