Home ताज्या बातम्या रत्नागिरीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना भक्तीभावाने निरोप

रत्नागिरीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना भक्तीभावाने निरोप

0

रत्नागिरी: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतीबाप्पांना भरपावसात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील 10 हजार 88 घरगुती आणि दोन सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सोमवारी वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़ यंदा 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना झाली. तर 111 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची पुचाअर्चा सुरु आहे. दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर गणपती बाप्पांनी भक्तांचा निरोप घेतला. कोसळणाऱ्या पावसात सायंकाळी चार वाजल्यानंतर दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन सुरु झाले. रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी पावसात गणपतीची पुजाअर्जा करत विसर्जन करण्यात आले. निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था रत्नागिरी नगर परिषदेने केली होती. रत्नागिरी तालुक्यात 1166 गणेशमुर्ती, संगमेश्वर तालुक्यात 1006 गणेशमुर्ती, राजापूरात 512 गणेशमुर्ती, लांजामध्ये 125, गुहागरात 825,चिपळूणात 449 खेडमध्ये 152 घरगुती आणि 1 सार्वजनिक, मंडणगडमध्ये 1035, दापोलीत 1690 घरगुती आणि 1 सार्वजिनक गणेशमुर्तीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले.