Home शहरे अकोला रस्ते निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर – महासंवाद

रस्ते निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर – महासंवाद

0
रस्ते निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर – महासंवाद

अमरावती, दि.30:  दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात रस्त्यांची निर्मिती व सुधारणा अत्यावश्यक आहे. रस्त्यांच्या निर्मिती व बळकटीकरणामुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल. नागरिकांसाठी रस्ते निर्मिती व इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह‌्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

आज चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण भागात विविध योजनेअंतर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते निर्मिती व सुधारणांच्या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अर्थसंकल्पातर्गत प्राप्त 75 कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन

लोणी येथील पाळा ते लोणी NH 06 या 3 कोटी 41 लक्ष रुपयांच्या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता कामाचे भूमीपूजन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सोनोरा  बु. येथे  बग्गी सोनोरा बु. ते राजुरा येथील 5 कोटी 58 लक्ष रुपयांच्या निधीतून निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, पिंपळखुटा येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 3 कोटी 31 लक्ष रुपयांच्या निधीतून दाभाडा (कावली) ते पिंपळखुटा रस्ता कामाचे भुमीपूजन, पहुर येथे  MRL03 पाचोड ते पहुर NH 06 या 6 किमी रस्त्याचे 3 कोटी 64 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे भुमीपूजन आणि नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव कंझरा या 30 लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून रस्ते निर्मिती व सुधारणा कामे

जावरा येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रजिमा 34 जावरा ते ईब्राहिमपूर बग्गी रस्ता कामाचे 1 कोटी 22  लक्ष व झाडा निबोंली धामणगाव रेल्वे, सिरजगांव कोरडे येथे तुळजापूर ते सिरजगांव कोरडे या 4 कोटी 28 लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारण्याच्या कामाचे भूमिपूजन, धानोरा मोगल  येथील दिघी ते धानोरा मोगल या 3 किमी रस्त्याचे 2 कोटी 41 लक्ष रुपयांच्या निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन, नारगावंडी  येथे नारगावंडी ते भिल्लीच्या 2 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतून  रस्ता कामाचे भुमीपूजन, सोनोरा काकडे येथे बोरगाव निस्ताने ते सोनोरा काकडे रस्ता सुधारणा कामाचे 2 कोटी 31 लक्ष रुपयांच्या निधीतून  भुमीपूजन, नायगाव येथे SH 280  ते नायगाव पर्यंत 2 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांनी आज केले.

अर्थसंकल्पातून प्राप्त निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

आमला विश्र्वेश्र्वर नादगाव ख.- चांदुर रेल्वे – आमला – कुऱ्हा – आर्वी येथे 3 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन, तिवरा धनोडी सातेफळ घुईखेड रत्स्याच्या रुंदीकरणासह 4 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन, सावंगी संगम येथे नांदगाव खं. राजुरा पळसखेड चांदुर रेल्वे रस्ता सुधारणेचे  3 कोटी रुपयांच्या निधीतून रा. मा. 294 कामाचे  भुमीपूजन, मार्डी- कारला- चांदुर रेल्वे रा. मा. 303 रस्त्याचे 4 कोटी रुपयांतून  रुंदीकरणासह मजबुतीकरण कामाचे भुमीपूजन, धानोरा गुरव ते वाढोणा रस्ता सुधारणा कामाचे अर्थसंकल्पातून प्राप्त 2 कोटी रुपयांच्या निधीतून भूमीपूजन, कळमजापूर येथील चांदुररेल्वे सोनगाव बग्गी राजूरा रस्ता सुधारणेचे 3 कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या  कामाचे भुमीपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह लोणीचे सुरज औतकर, धानोरा गुरवचे आश्विनी शिंदे, पहूरचे अमृता जेठे, धानोरा मोगलचे अमोल लबाहर,सावंगी संगमच्या सरिता राऊत, सोनाराच्या कविता खडसे, जावराचे मिलिंद गुजरकर, कळमजापुरचे हर्षा गुढदे, सोनगावचे भानुदास गावंडे, कारल्याचे दीपाली जाधव, आदी गावातील सरपंच उपस्थित होते.

0000