Home पोलीस घडामोडी राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

0

मुंबई:  देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते म्हणून अजित पवारांनी केलेली मदत यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खूप मोठा भूकंप पाहायला मिळाला. शुक्रवारी रात्री भाजपाने महाविकासआघाडीच्या तीन पक्षांवर राजकीय स्ट्राईक करत थेट अजित पवारांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविलं. मात्र, या शपथविधीवर आक्षेप घेत महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात उद्या १०.३० वाजता याप्रकरणी निकाल देण्याची शक्यता असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विधानभवनात जाऊन आढाव घेतला आहे. 

त्याचप्रमाणे राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आज ठेवण्यात आला असून शीघ्र कृती दलाचे पथक देखील दाखल आहे.विश्वादर्शक ठराव घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांची तयारी ठेवली असून विधानभवन परिसरात पोलीस प्रशासन सज्ज राहिले आहे. त्यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विधानभवन परिसराची पाहणी आज करण्यात आली आहे. तसेच मुंबईसह राज्यात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.