Home मनोरंजन राजकीय कार्यक्रमांसाठी खुली ,मग नाटकांसाठीच नाट्यगृहं बंद का?

राजकीय कार्यक्रमांसाठी खुली ,मग नाटकांसाठीच नाट्यगृहं बंद का?

0
राजकीय कार्यक्रमांसाठी खुली  ,मग  नाटकांसाठीच नाट्यगृहं बंद का?

[ad_1]

मुंबई टाइम्स टीम

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील कालिदास नाट्यगृहात राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. एकीकडे नाट्यगृहात नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी राज्य सरकारनं निर्बंध लावले असताना राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह का दिलं गेलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची दखल घेत बुधवारी, ‘मुंटा’नं ‘नाटकांसाठीही दारं उघडा’ या शीर्षकांतर्गत वृत्त प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये नाट्यसृष्टीतील रंगकर्मींनी आपली नाराजी नोंदवली. तसंच वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरातील रंगकर्मींनी, नाट्यरसिक प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी राज्य सरकारच्या दुजाभाव करण्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्यात नाट्यगृहांवर निर्बंध असताना नाशिकमधील घटनेवर कारवाई करण्याचा आग्रह नाट्यवर्तुळातून होतोय.

‘नेता नाट्यगृहात आणि अभिनेता घरात. अनेक दिवसांपासून नाट्यगृहं बंद आहेत; त्याचं कारण करोना; परंतु राजकीय कार्यक्रम, निवडणुका, सभा, बैठका, पक्ष कार्यालयांचे उद्घाटन आदींसाठी करोना नाहीय. आम्हा सामान्य माणसाप्रमाणेच करोनाचा विषाणूसुध्दा राजकारण्यांना घाबरत असावा.’ अशी समर्पक प्रतिक्रिया अभिनेता संदीप पाठकनं नोंदवली आहे. तर दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेनं सवाल केला आहे की, ‘आपला तो बाळ्या… दुसऱ्याचे ते कार्टे!!! ज्या जोमाने, मोठ्या संख्येने राजकीय कार्यक्रम, दौरे सुरू आहेत. त्या मानाने मग खबरदारी घेऊन सर्व नियमांचे पालन करत सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम का नाही होऊ शकत?’ तसंच लेखक-दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणतो, ‘तक्रार करून करून कंटाळा आलाय किंवा खरं तर आता हसू झालंय. वर्षभराहून जास्त काळ इतर व्यवसायांप्रमाणे नाटक-सिनेमांचंही कंबरडं मोडलंय! सर्व जण आर्थिक झळ सोसत शांत बसून आहेत. पण, हे वारंवार होणारे राजकीय कार्यक्रम मात्र थांबत नाहीत.’ प्रियदर्शन जाधव, ऋतुजा बागवे, क्षिती जोग आदी कलाकारांनीदेखील या घटनेबाबत नाराजी दर्शवली आहे. सोशल मीडियावर सध्या #रंगभूमीसुरूकरा हा हॅशटॅग कलाकारांकडून पोस्ट केला जातोय.

सांस्कृतिक मंत्री गप्प का?
नाट्यगृहात राजकीय कार्यक्रम होऊन दिवस लोटले तरी राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडून किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया आली नसल्यानं नाट्यसृष्टी नाराज आहे. तातडीनं या प्रकरणात सांस्कृतिक विभागानं लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी रंगकर्मी करत आहेत. सर्वांना सारखेच नियम असावेत असं त्यांचं मत आहे. सांस्कृतिक मंत्री गप्प का? असा सवालदेखील नाट्यवर्तुळातून विचारला जातोय. ‘मुंटा’च्या प्रतिनिधीनं गुरुवारी दुपारी सांस्कृतिक मंत्री यांची याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता; ‘मंत्री बैठीकीत व्यग्र आहेत’ असं उत्तर मिळालं.

संपर्क नाही
‘मुंटा’नं सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक तसंच खात्याचे उपसचिव यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा गुरुवार, संध्याकाळ ५ वाजेपर्यंत प्रयत्न केला असता; संपर्क झालेला नाही.

[ad_2]

Source link