Home ताज्या बातम्या राजगड पार्क वेल्हे येथे पुण्यातील नामांकित सिक्युरिटी एजेन्सीच्या मालकांचे दुसरे चर्चासत्र झाले.

राजगड पार्क वेल्हे येथे पुण्यातील नामांकित सिक्युरिटी एजेन्सीच्या मालकांचे दुसरे चर्चासत्र झाले.

0

दिनांक ९/१० नोव्हेंबर रोजी दोन दिवशीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले, या चर्चासत्राला मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्हा अधिक सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा विषयक प्रश्नावर व्याख्याने आणि वेगवेगळ्या बैठका झाल्या.

पुणे शहरात सेफ्टी और सिक्युरिटीचे ६५ मालकांचे जवळपास ५००० हुन अधिक सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणावर कर्तव्यावर आहेत त्यांच्यासाठी भविष्यात काही सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यासाठी आणि पुणे सुरक्षित करण्यासाठी पुण्याचे कर्तव्यदक्ष मा. पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे (भापोसे), (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे (भापोसे), मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ हा कार्यक्रम आयोजित करून पुणे शहरातील खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेना जोडून अधिक मोठ्या आणि सक्षम पद्धतीने अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला आहे.

खाजगी सुरक्षा रक्षक संस्था हि जबाबदारी घेऊन पुणे शहराला अधिक खाजगी क्षेत्रातील सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे म्हणून झालेल्या चर्चासत्रातून पुणे सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या ६५ मालकांनी शिक्का मोर्तब केले.

पुण्यात कर्तव्य करताना या पुढे अनधिकृत एजेन्सीचे प्रमाण रोखण्यास मदत करणार आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ सुरक्षा रक्षक संस्थेचा वतीने देण्यात येणार आहे.

या चर्चासत्र दरम्यान सुरक्षा यंत्रणा आणि प्रणाली विकसित आणि अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी या वेळी २० ठराव एक मताने मंजूर करण्यात आले.. या पुढे या सिक्युरिटी एजेन्सी एकसारखे कर्तव्य आणि एकसंघ व एकाच प्रतीचे कामकाज करताना दिसणार आहे त्यावेळी पोलीस प्रशासनाचे गुप्त विशेष पोलीस दूत म्हणून शहरात कर्तव्य करताना दिसणार आहेत.

सुरक्षा रक्षक संस्थेचे मालक हे शासनाचा नियमा प्रमाणे काम करताना जनतेची सेवा करतील आणि आपत्कालीन व्यवस्थेमधे आम्ही पोलिस प्रशासनाचा पाठीशी खंबीर पुणे उभे राहणार आहोत असे बैठकीतून निष्कर्ष झाला आहे.

विविध विषयावर कार्यशाळा आयोजित केल्या त्यात विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कर्तव्यावर चर्चा झाल्या तसेच येणाऱ्या आपत्ती काळात पुणे शहरात सुरक्षा रक्षक हे पोलीस प्रशासना सोबत खासदुत म्हणून स्वयंसेवक पद्धतीने कामकाज पाहतील.

पी-४ चे समन्वयक मा.सचिन मोरे भारत शिल्ड फोर्स (संस्थापक) यांनी मान्यवरांचे आणि सहभागी संस्थेचे सत्कार करून त्यांना सन्मान चिन्हे आणि सुरक्षा कायदे विषयक पुस्तके देण्यात आले व त्यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.