हायलाइट्स:
- शिल्पाने नवऱ्याच्या राजच्या अटकेनंतर पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
- भविष्यातही आव्हानांना सामोरी जाणार असल्याच्या शिल्पानं व्यक्त केल्या भावना
- राजच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष
अश्लिल व्हिडीओ तयार करणे आणि ते इंटरनेवर अपलोड केल्या प्रकरणी शिल्पाचा नवरा राजला अटक झाली. राजला अटक झाल्यानंतर प्रथमच शिल्पा शेट्टीने आपली मानसिक स्थिती व्यक्त करणारी एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने गुरुवारी रात्री तिच्या इन्स्टाग्रामवरून लेखक जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील एका लेखातील पानाचा फोटो शेअर केला.
त्यात असे लिहिलेले आहे की, ‘रागात मागे वळून पाहू नका आणि घाबरून पुढेही पाहू ना. जागरुक होऊन फक्त आसपास पाहा. आपण रागात त्या लोकांना आपल्या मागे पाहतो ज्यांनी आपल्याला सर्वात जास्तदुःख दिलेलं असतं आणि नोकरी तर जाणार नाही या भीतीने आपण घाबरतच पुढे पाहत असतो. भीती आपल्या जवळच्या लोकांना गमावण्याची किंवा आजारपणाचीही असू शकते.आपण वर्तमानामध्ये जगायला शिकले पाहिजे. काय घडले आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी आहे त्या वास्तवात जगले पाहिजे.’

यात पुढे असे म्हटले आहे, ‘जिथे आपल्याला असायला हवे तिथे आपण आहोत. हा विचार करू नका की काय झाले होते आणि काय होणार आहे. फक्त जागरूक रहा. मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजते आणि एक दीर्घ श्वास घेते. त्यानंतर विचार करते की मी भाग्यवान आहे म्हणून हे आयुष्य जगते आहे. मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना सामोरे गेली आहे आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांनाही सामोरी जाणार आहे. आयुष्य समरसून जगण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही.’
या लेखात व्यक्त केलेल्या सर्व भावना शिल्पा शेट्टीच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून शिल्पाने तिच्या मनातील भावना अप्रत्यक्षरित्या व्यक्त केल्या आहेत. राज कुंद्राच्या अटकेसंदर्भात किंवा या विषयाबाबत तिने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. परंतु भविष्य काळात येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी ती तयार आहे.

शिल्पाला दिलासा
शिल्पा शेट्टीही पॉर्नोग्राफीच्या व्यवसायात राज कुंद्राला साथ देत होती का या संदर्भात पोलीस तपास अद्याप सुरू आहे. मात्र, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा या सर्व प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवण्यात येणार नाही.
दरम्यान, आज राजच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याला आता २७ जुलैपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. पॉर्न फिल्मच्या धंद्यासोबतच आता पोलीस ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाचीही राजची चौकशी करणार आहेत.