हायलाइट्स:
- पॉर्नोग्राफीबद्दल शिल्पा शेट्टीला सगळी माहिती आहे
- मॉडेल सागरिका शोना सुमनने केला खळबळजनक आरोप
- राज कुंद्राच्या प्रत्येक कंपनीत शिल्पा शेट्टी आहे डायरेक्टर
बायकोला नवऱ्याच्या गोष्टी माहिती असतात
पॉर्नोग्राफी प्रकरणाविरोधात पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणामध्ये राज कुंद्रा चा सहभाग असल्याचा संशय सर्वप्रथम मॉडेल सागरिका शोनाने केला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये राजच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले आणि त्याला अटक करण्यात आली. राजला अटक झाल्यानंतर सागरिका शोनाने एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘या प्रकरणाची संपूर्ण माहिती राजची बायको शिल्पा शेट्टी ला होती. कारण राजच्या प्रत्येक कंपनीमध्ये ती डायरेक्टर आहे. कंपनीमध्ये काय चालले आहे हे त्या कंपनीच्या डायरेक्टरला माहिती नाही असे कसे होऊ शकते? त्यामुळे पोलिसांनी शिल्पाची देखील सखोल चौकशी करायला हवी. तिला या पॉर्न रॅकेटबद्दल सर्व माहिती असणारच आहे, याची मला खात्री आहे.’
पोलिसांना नक्कीच मदत करीन
सागरिकाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ याप्रकरणी जर मला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर मी नक्की जाईन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करीन. मला ऑडिशनवेळी जो कॉल आला होता तो व्हॉट्सअप कॉल होता. त्यामुळे मला तो रेकॉर्ड करता आला नाही. अन्यथा तो पुरावा म्हणून मी पोलिसांना देऊ शकले असते.’
व्हॉट्सअपवर न्यूड व्हिडीओ पाठवण्याची मागणी
सागरिकाने याआधी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, एका वेब सीरिजसाठी तिने व्हिडीओ कॉलद्वारे ऑडिशन दिली होती. ही ऑडिशन राज कुंद्रा, त्याचा साथीदार उमेश कामथ आणि आणखी एका व्यक्तीने घेतली होती. या व्यक्तीने मास्क लावला होता. ही ऑडिशन सुरू असताना राज कुंद्राने तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले. परंतु तिने ही गोष्ट करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.