नवी दिल्ली, ३१ : थोर समाजसुधारक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित आज महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी मंत्री महादेव जानकर, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह सदनातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचाही थोडक्यात परिचय करून दिला.
0000000






















WhatsApp