Home बातम्या ऐतिहासिक राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

0
राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली , 20 : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी  करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.