राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – महासंवाद

राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – महासंवाद
- Advertisement -

नवी दिल्ली, दि. 14 :  भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  131 वी  जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ राजेश अडपावार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनीही  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

- Advertisement -