Home शहरे अकोला राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी राज्यात विविध ठिकाणी विशेष व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांंचे आयोजन – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी राज्यात विविध ठिकाणी विशेष व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांंचे आयोजन – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

0
राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी राज्यात विविध ठिकाणी विशेष व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांंचे आयोजन – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. ५ : आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामध्‍ये ६ मे या एकाच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, मुंबई प्रशासकीय  विभागातील वरद विनायक गार्डन, नवीन पनवेल या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

पनवेल येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रा.दामोदर मोरे; राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक व सामाजिक विचारधारा व सद्यस्थिती यावर आपले विचार मांडतील,  तर शाहीर अशोक निकाळजे व सहकलाकार यांचे राजर्षी  शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर, विविध सामाजिक विचारांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या कार्यक्रमांतून, राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक/ शैक्षणिक/राजकीय विचारधारा, समता मूलक समाज निर्मितीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान, राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक पैलू अशा आशयाच्या विविध विषयांवर व राजर्षी शाहू महाराज यांच्या वैचारिक पैलूंवर विशेष व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम राज्यातील  सर्व प्रशाकीय विभागात आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एक कार्यक्रम पनवेल येथे होत आहे.

पनवेल येथे आयोजित या कार्यक्रमात; राजर्षी  शाहू महाराज स्मृती शताब्दीदिनी  विशेष  व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकाराचा किंबहुना राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या विचारवंताचे विशेष व्याख्यान तसेच शाहिरी पोवाडा, गीतगायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा, कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री.विभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.