राजेवाडीच्या तरूण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

माजलगांव:(प्रतिनिधी)माजलगांव तालुक्यातील राजेवाडी येथील तरूण शेतकरी मयत गणेश गंगाधर घुबडे वय वर्ष( २६) या शेतकर्याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळुन काल दि. 13 रात्री 11 च्या दरम्यान गावापासून दोन किलोमीटर भाराभाई वस्ती शेतातील राहत्या घरच्या पत्राश्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली .


याबाबत अधिक माहिती अशी की,
माजलगाव तालुक्याला गेल्या वर्षापासुन दुष्काळाने ग्रासले आसुन तालुक्यात आत्महत्याचे सञ सुरूच आहे. राजेवाडी येथील शेतकरी मयत गणेश गंगाधर घुबडे वय (२६ ) वर्ष या शेतकर्यानी सततची नापिकी तसेच डोक्यावर कर्जाचा डोंगर व यावर्षीची पेरणी कशी करायची यासह आनेक विवेचनेतुन निराश होऊन राहत्या घराच्या पत्राराच्चा स्वताचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आसुन शेतकर्याच्या स्वतच्या नावे दिड एकर कोरडवाहु जमीन आसुन त्यांचेकडे लाखो हजार कर्ज आहे. मयत शेतकर्याच्या पश्चात आई वडील नसून,दोन भाऊ, बहिण दोन पत्नी व एक लहान मुलगी आहेत. घुबडे कुंटूंबाची परिस्थिती अंत्यत बिकट आसुन परिस्थिती असल्याची माहिती आहे. मदतेची गरज आसुन त्वरित मदत करावी अशी मागणी गावतील नागरिकांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

- Advertisement -