मुंबई- दाक्षिणात्य स्टार राम चरण याने नुकताच मुंबईत सी-फेसिंगचा बंगला विकत घेतला. असं सांगितलं जातंय की त्याने खार भागातील एक बंगला विकत घेतला असून घरातून अथांग समुद्र दिसतो. सध्या राम एस.एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर‘ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान रामच्या पत्नीने मुंबईतील घरात गृहप्रवेशही केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राम बॉलिवूडमधील अनेक सिनेनिर्मात्यांना भेटत आहे. या काळात त्याला हॉटेलमध्ये रहाणं आरामदायक वाटत नव्हतं, म्हणून त्याने मुंबईत मालमत्ता विकत घेतली.
राम चरन अलीकडच्या काळात बॉलिवूडमधील अनेक सिनेनिर्मात्यांना सातत्याने भेटत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकवेळी हॉटेलमध्ये राहणं त्याला पटत नव्हतं. शिवाय हॉटेल घरासारखं आरामदायक नसल्यामुळेही तो फारसा आनंदी नव्हता. यावर उपाय म्हणून त्याने मुंबईत घर घेण्याचा निर्णय घेतला. आता हैदराबादवरून मुंबईत येताना तो हॉटेलमध्ये नाही तर स्वतःच्या सी-फेसिंग घरात राहणार.
या सिनेमांमध्ये राम चरण दिसणार आहे
राम चरण याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘आरआरआर’ मध्ये ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण या कलाकारांसोबत दिसणार आहे. १३ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यानंतर दिग्दर्शक शंकर यांच्या सिनेमाचं तो काम सुरू करणार आहेत. या सिनेमात त्याच्यासोबत किआरा आडवाणीचीही मुख्य भूमिका असणार आहे.
- Advertisement -