Home बातम्या ऐतिहासिक राज्यपालांच्या हस्ते जैन रत्न पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते जैन रत्न पुरस्कार प्रदान

0
राज्यपालांच्या हस्ते जैन रत्न पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते नवनीत प्रकाशनचे बिपीन गाला, वसंत गलिया तसेच  प्रदीप फोफानी यांना आज (दि. ३०) राजभवन येथे ‘जैन रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या काळात मोफत व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, मोफत आयसीयू बेड्स सुविधा, भोजन सुविधा व मास्क वाटप करून शेकडो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल गाला, गलिया व फोफानी यांना जैन रत्न पुरस्कार देण्यात आले.

श्री. बी.एन. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भूपेंद्र मेहता, वर्षा मेहता, अनिल गाला व इतर मान्यवर उपस्थित होते.

००००

Governor presents Jain Ratna Awards

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Jain Ratna Awards to philanthropists Bipin Gala of Navneet Prakashan, Vasant Galiya and Pradip Fofani at Raj Bhavan Mumbai on Wed (30 Mar). The awards were presented to Gala, Galiya and Fofani for their multifarious work during the COVID-19 pandemic.

The awards were presented on behalf of the Shree B N Mehta Charitable Trust.

Bhupendra Mehta, Varsha Mehta, Anil Gala and others were present.