Home शहरे कोल्हापूर राज्यपालांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन

राज्यपालांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन

0

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 10.30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हेलिकॉप्टरने कोल्हापूरच्या विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्या नंतर राज्यपाल कोशारी हे शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास्थळी रवाना झाले.