मुंबई, दि. १८ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत ‘चांद -तारा’ या मोहम्मद अली बेग निर्मित दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलरचे लोकभवन, मुंबई येथे विशेष प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाला चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कान्स चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता.
हा चित्रपट प्रसिद्ध गायिका तारामती आणि गोलकोंडा साम्राज्याचे सुलतान अब्दुल्ला कुतुब शाह यांच्या ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. सुलतानने या महान गायिकेच्या स्मरणार्थ ‘तारामती बारादारी’ हे स्मारक उभारले होते. एका गायिकेच्या सन्मानार्थ राजाने स्मारक उभारणे हीच मुळात एक विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण कहाणी आहे, असे सांगून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने १७व्या शतकातील वातावरण आणि त्या काळचे वातावरण प्रभावीपणे उभारल्याबद्दल राज्यपालांनी निर्माता दिग्दर्शक मोहम्मद अली बेग यांचे कौतुक केले.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, अंजन श्रीवास्तव, रंजना श्रीवास्तव, इला अरुण, आरिफ झकारिया यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर चित्रपट ट्रेलर प्रदर्शनाला उपस्थित होते.
0000









WhatsApp